*पंचायत समिती एरंडोल येथे निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन*. ( एरंडोल जिल्हा जळगाव प्रतिनिधी) _आंतरराष्ट्रीय ध्यान दिन दरवर्षी 21 डिसेंबर रोजी जगभर साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सकाळी पंचायत समिती एरंडोल येथील हॉलमध्ये , श्री भगवती क्लासेस, एरंडोल यांच्यावतीने निशुल्क पिरॅमिड धानाचे आयोजन करण्यात आले होते. ध्यान मास्टर देवयानी कृष्णा महाजन यांनी सुरुवातीला पिरॅमिड ज्ञानाचे महत्त्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गाला सांगितले. ध्यानामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते .मन एकाग्रतेची क्षमता वाढवते. सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री दादाजी एकनाथ जाधव (गट विकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल), श्रीमती प्रतिभा भीमराव सुर्वे (सहाय्यक गटविकास अधिकारी, पंचायत समिती एरंडोल) तसेच श्री.डी.एस. माळी(सहा.प्रशासन अधिकारी),श्री.योगेश पाटील(कनि.प्रशासन अधिकारी), सर्व विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता, व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0