**जि.प. केंद्रिय प्राथमिक शाळेत स्वच्छता दूत शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान*. (मानवत / प्रतिनिधी.)————————पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत राष्ट्रसंत गाडगे महाराजांची पुण्यतिथी स्वच्छता दूतांचा सन्मान करून साजरी करण्यात आली. स्वच्छतेचे महामेरू राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त नियमित वर्ग शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचा स्वच्छता दूत म्हणून सन्मान करण्यात आला... शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ सर, ज्येष्ठ शिक्षक राजकुमार लांडे सर, श्रीमती सत्यभामा गिरी यांच्या हस्ते स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी *{ ड }* च्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण केले... गणेश लाठर, ज्ञानराज अशोक नायबळ, शिवम कोंडगीर, सतीश देवके आणि श्वेता भदर्गे यांनी वेशभूषेत नाटिका सादरीकरण केले... स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना नियमित स्वच्छता हा संस्कार आहे... या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.***

जि.प. केंद्रिय प्राथमिक शाळेत स्वच्छता दूत शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान*.                                                       
Previous Post Next Post