पाल वृंदावन धाम आश्रमात संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या पुण्यतिथी निमित्त दोन दिवसीय महोत्सव* (पाल ता रावेर) :-रावेर तालुक्याच्या आदिवासी दुर्गम भागातील श्री वृंदावन धाम पाल आश्रमात अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे आराध्य सदगुरु परम पूज्य ब्रम्हलीन संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या सोळाव्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त दि २४ ते २५ डिसेंबर रोजी विद्यमान पदस्थ श्रधेय संत श्री गोपाल चैतन्य जी महाराज यांच्या प्रेरणेने दोन दिवसीय कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात येत असून यामध्ये परम पूज्य बापुजींचे गुरुवर्य संत श्री महादेव चैतन्य उर्फ दगडू जी बापू यांची जयंती तसेच पाल आश्रमात स्थित भव्य आणि दिव्य श्री हरिधाम मंदिर वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून दि.२४ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून १० वाजेपर्यंत दीपोत्सव व भजन संध्या चे आयोजन केले जाणार असून दि. २५ डिसेंबर रोजी परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत श्री हरिधाम मंदिर स्थित पूज्य बापुजींच्या समाधी मंदिरात चरण पादुका पूजन व अभिषेक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ७ ते ८ वाजेपर्यंत ध्यान, प्रार्थना आणि त्यानंतर १० ते १ वाजेपर्यंत या महोत्सवात उपस्थित संत,महंत,महामंडलेश्वर यांचे श्रद्धावचन आणि महाआरती नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या भव्य महोत्सवानिमित्त सर्व भक्तांनी उपस्थित राहून परम पूज्य बापुजी यांना श्रद्धाजंली अर्पण करावी असे आवाहन अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार समिती तर्फे करण्यात येत आहे.

पाल वृंदावन धाम आश्रमात संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजींच्या पुण्यतिथी निमित्त दोन दिवसीय महोत्सव*      
Previous Post Next Post