वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी घेतला विविध विभागाचा आढावा.................................. पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार आदी विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या.बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. टिकले, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी शहरातील प्रमुख चौक, रस्त्ये तसेच गर्दीच्या ठिकाणी असलेले ट्रॉन्सफॉर्मर सुरक्षित ठिकाणी हलवावे जेणेकरुन वाहतुकीला अडथळा होणार नाही व अनूचित घटना घडणार नाही यादृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत तारेची भूमीगत जोडणी करावी. यासाठी पुढील आराखडा तयार करुन नियोजन समितीच्या बैठकीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाने सालोड, दत्तपूर चौकातून जाणाऱ्या महामार्गाच्या रस्त्याची कामे तातडीने हाती घ्यावे, असे सांगितले.तसेच प्रलंबित असलेले जिल्ह्यातील बांधकामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्यात. जिल्ह्यात सहकारभवन बांधण्यात येणार असून यासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जागेचा व बांधकामाचा प्रस्ताव तत्काळ सादर करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बैठकील संबंधित विभागाला केल्यात..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0