दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी संत पैकाजी महाराज संस्थान, सास्ताबाद (सा.) येथे भक्तांच्या सोयीसुविधांसाठी उभारण्यात आलेल्या "क "वर्ग तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम सन २०२२-२३ व २३-२४ मंजुर निधी ५५ लाख रूपये किमतीचे नवीन सभागृह बांधकामाचा भव्य लोकार्पण सोहळा तसेच अतिरिक्त ३३ लाख रुपये इतर बांधकामासाठी मंजूर करण्यात आले अत्यंत भक्तिमय, श्रद्धापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पावन प्रसंगी मा. ह.भ.प. गुरुवर्य पुंडलीक महाराज बोळवटकर, श्री संत पैकाजी महाराज देवस्थान समितीचे मान्यवर पदाधिकारी, तसेच गावकरी मंडळी व भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांच्या साक्षीने या नवीन सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.हे सभागृह संस्थानाच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असून, कीर्तन, प्रवचन, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध सामाजिक उपक्रम अधिक सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी याचा मोठा लाभ होणार आहे. भक्तांच्या गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेले हे सभागृह म्हणजे संत पैकाजी महाराजांच्या सेवाभावी परंपरेचा एक सशक्त वारसा आहे.तसेच संत पैकाजी महाराज संस्थान ला 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने आमदार समीर कुन्नावार यांच्या सन्मान सत्कार केलेला आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0