स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी धर्माबाद पोलिसातर्फे मोफत टेस्ट सिरीज पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांचा स्तुत्य उपक्रम.. (धर्माबाद (वार्ताहर) स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या धर्माबाद तालुका व शहरातील अनेक होतकरू, सुशिक्षित युवकांना योग्य मार्गदर्शनाची आणि संधीची आवश्यकता आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात तरुणपिढी मागे पडू नये, तसेच मटका, जुगार, व्यसनाधीनता यांसारख्या घातक प्रवृत्तींपासून दूर राहावे, हा सामूहिक समाजहिताचा उद्देश लक्षात घेत धर्माबादचे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी एक वेगळा स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेतला असून धर्माबाद तालुक्यात प्रथमच एक प्रशासकीय अधिकारी तालुक्याचे भविष्य सुधारन्या सोबतच तरुणांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.धर्माबाद शहरातील एलबीएस कॉलेज येथे सातत्याने विद्यार्थ्यांसाठी ऑपरेशन सिंदूर मध्ये यशस्वी कामगिरीकेलेले सेवानिवृत्त सैनिक चरण बुद्धीवंत हे मैदानी चाचणी ची उत्कृष्ट तयारी करून घेत आहेत याच सामाजिक दायित्वाचा एक भाग म्हणून धर्माबाद पोलीस स्टेशनच्यावतीने मोठी जबाबदारी उचलत पुणे येथील जी. के. पब्लिकेशनचे गणेश काळे सर यांच्या सहकार्याने तालुका व शहरातील स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट सिरीज आयोजित करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सदाशिवयुवकांना रोजगाराच्या संधीसाठी सक्षम करणे, स्पर्धा परीक्षेतील गुणवत्ता वाढवणे, युवकांना चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर ठेवणे, समाजात सकारात्मक बदल घडविणे असा सकारात्मक उद्देश यात आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत टेस्ट सिरीज उपलब्ध तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन आपल्या उज्ज्वल भवितव्याचा पाया मजबूत करावा असे आवाहन धर्माबाद पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी केले आहे.भडीकर यांचा हा उपक्रम धर्माबाद तालुक्यातील युवकांना दिशा देणारा ठरणार आहे. यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्यांनी असा उपक्रम राबविला नव्हता पहिल्यांदाच असा प्रेरणादायी, उपक्रम कृतीत येत आहे.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
byमीडीया पोलीस टाईम
-
0