"ऑपरेशन प्रहार अंतर्गत पो.स्टे. डाबकी रोड पोलीसांनी बकरी चोरी प्रकरणात १२ तासांचे आत आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हयातील चोरीचा मुददेमाल केला जप्त "(**अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान*)सदर प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशाप्रकारे आहे की, पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे दिनांक १४/१२/२०२५ रोजी अप नं ४१०/२०२५ कलम ३०३ (२) बी.एन.एस. चा गुन्हा दाखल असुन फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला ला जबानी रिपोर्ट दिला की, त्यांचे कडील तसेच त्याचे शेजारी राहणारे लोकांचे बक-या नेहमीप्रमाणे चारण्यासाठी सोडल्या होत्या सदर बक-यांमधील फिर्यादी यांची एक बकरी तसेच शेजारी राहणारे साक्षीदार यांचे ०२ बक-या त्या नेहमीप्रमाणे घरी परत आल्या नाहीत म्हणून त्यांचा आजुबाजुचे परीसरात तसेच अकोला शहरामध्ये शोध घेतला असता मिळुन आल्या नाहीत. सदरच्या ०३ बक-या कि.अं. २८,०००/रु. च्या कुणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेल्या आहेत अशा फिर्यादी यांचे जबानी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा दाखल करुन तपासात घेण्यात आला.सदर गुन्हयाचे तपासाचे कामकाज गुन्हे शोध पथकातील अंमलदार नापोकों राजेश ठाकुर, पोकों मंगेश गिते यांनी तात्काळ हाती घेवुन मा. ठाणेदार साहेब तसेच पोउपनि अनिल चव्हाण साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयातील चोरी मुददेमाल तसेच अज्ञात आरोपी याचे शोध कामी रवाना होवुन त्यांना प्राप्त बातमीदार यांचे बातमीवरुन संशयीत इसम १) मोहम्मद शाबाज मोहम्मद आरीफ २) अफजल खान अब्दुल खलील खान यांना ताब्यात घेवुन त्यांचे कडे विश्वासात घेवुन विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली. गुन्हयातील चोरी मुददेमाल ०३ बक-या कि.अं. २८,०००/रु. हया आरोपी यांचे कडुन दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आल्या.ऑपरेशन प्रहार संकल्पने अंतर्गत सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधिक्षक श्री रेडडी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील साहेब, ठाणेदार श्री. दिपक कोळी पो.स्टे. डाबकी रोड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अनिल चव्हाण, एएसआय दिपक तायडे, पोहेकों प्रेम कश्यप, नापोकों राजेश ठाकुर, पोकों मंगेश गिते, सर्व पो.स्टे. डाबकी रोड अकोला यांनी केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0