*नाशिक कुंभमेळा समीती.* नाशिक,पंचवटी, तपोवन यावर खरा अधिकार नाशिक मधे राहाणारा माणूस,कर भरणारा माणूस, श्वास घेणारा माणूस,संसार,संस्कार जपणारा माणूस याचा आहे.तोच निर्णय घेईल.आणि मंत्री, कलेक्टर, आयुक्त त्याप्रमाणे काम करतील.हिच तर लोकशाहीची मुळ संकल्पना आहे. आपण या समीतीच्या नाशिक तपोवन मधे बैठक घेऊ.त्यातील अहवाल कलेक्टर, आयुक्त, मंत्री गिरीश महाजन, नाशिक चे तीन आमदार,शहराचा खासदार यांना कळवू. मंत्री, कलेक्टर, आयुक्त हे फक्त कार्यकारी आहेत.म्हणून त्यांना मानधन, पगार,भत्ते वगैरे देतो.पण पैसा तर नाशिक च्या नागरिकांच्या करातून जमा होतो.हा मुळ पाया आहे.त्यावरच लोकशाही उभी आहे.उभी राहिली पाहिजे.ती टिकवून ठेवणे आपली जबाबदारी आहे.ज्यांना वेदना होतात, संवेदना होतात,त्यांची. या समीतीचे अध्यक्ष आणि निर्णायक पद मा.निरंजन टकले साहेब यांचेकडे देऊ.कारण ते स्थानिक आहेत.ज्ञानी आहेत.निर्भय आहेत.अढळ आहेत.लढण्याची तळमळ आहे. या समीती मधे मा.सयाजी शिंदे यांना मानाचे स्थान देऊ.यात टकले साहेब,सयाजी शिंदे साहेब हे दिशादर्शक आणि निर्णायक असतील.कारण ते याच मानसिकतेतून काम करतात.त्यांची या आधीच वृक्ष वाचवा मोहिम आहे.ते डिव्होटेड आहेत.निर्भय आहेत.अढळ आहेत.तपोवन मधे आंदोलनाची सुरूवात केली आहे . यात फक्त कुंभमेळा बाबत, तपोवन परिसरातील झाडे वाचवण्याबाबत जे फोटो, व्हिडिओ, याबाबतीत मंत्री ची विधाने बातमी,नियम,कायदे , पौराणिक ग्रथांचे संदर्भ असे लिहा.म्हणजे एकमेकांना माहिती मिळेल.उत्साह वाढेल. निर्णय नाशिक चे रहिवाशांनी घ्यायचा आहे.कारण यांचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत.मी धार्मिक आस्थेने यात सहभागी आहे.सरकारमधील मंत्रीची मुजोरी आणि निधीची चोरी विरोधात मला चीड आहे. समीतीच्या बैठकीची गरज पडेल तेव्हा नियोजन करा.आम्हाला कळवा.आम्ही येतो.आपण यासाठी पैसा जमा करायचा नाही.ज्याला जसे वाटेल तितके योगदान करावे.एकमेकांकडून मागू नये.आग्रह करु नये.असे केल्याने आपले मन खराब होते.मती बिघडते.चूक होते. आमची शारिरीक, बौद्धिक क्षमता असेल तर आम्ही नाशिकला येऊ.आमचे जगण्याचे ओझे कोणाच्याही खांद्यावर ठेवणार नाही.जोपर्यंत मृत होत नाही. समीतीच्या बैठकीला कोणी आले नाही किंवा येऊ शकले नाही तर दोष देऊ नका.तो माणूस असमर्थ असतो.मानसिक किंवा शारिरीक किंवा परिस्थितीजन्य. कोणाचे विचार,सुझाव आवडला नाही तर येथे अपमान करू नका.स्वतंत्र फोन वर आपसात बोला.जेणेकरून कटुता निर्माण होणार नाही.स्पर्धा निर्माण होणार नाही. आपले इप्सित कार्य संपले कि गृप विखंडित करू.आपले मुद्दे असतील १) तपोवन मधील झाडे तोडू न देणे.२) कुंभमेळा साठी आवश्यक फेरबदल, बांधकाम करणे३)गरज असेल तरच पैसा खर्च करणे४)खर्चावर नियंत्रण ठेवणे.५) फक्त धार्मिक हेतू साध्य करणे.६)रामा प्रति श्रद्धा समर्पण करणे.७) धर्माबाबत प्रबोधन करणे.८)रिलीजियस रिफर्मेशन साठी प्रयत्न करणे.९) गिरीश महाजन प्रामाणिक माणूस नाही.उलट सुलट विधाने करतात.उफराटे काम करतात.१०) गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री म्हणून योग्य कि अयोग्य?हे नाशिक चे नागरिकांनी ठरवले पाहिजे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभिर्याने विचार करावा.अशी आपली भूमिका आहे. आणखी काही मुद्दे असतील.तुम्ही लिहा. *समीतीची बैठक वेळ स्थळ ठरवा.* शक्यतो रविवार आणि तपोवन! * ... शिवराम पाटील, जळगाव ९२७०९६३१२२
byमीडीया पोलीस टाईम
-
0