राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार २०२५ ने मुकेश कडाळे पाटील यांचा सन्मान*. (अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)खामगाव:राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार – २०२५ खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश कडाळे पाटील यांना प्रदान करण्यात आला. पुणे येथील शिव प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य व कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार स्वीकारताना मुकेश कडाळे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “हा सन्मान माझ्यासाठी केवळ गौरव नसून समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा अत्यंत भावनिक क्षण आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, हा पुरस्कार त्यांच्या एकट्याचा नसून त्यांच्या कार्यामागे सातत्याने उभे राहणारे मार्गदर्शक, सहकारी, मित्र, कुटुंबीय आणि समाजातील सर्व घटकांचा सामूहिक सन्मान आहे.समता, सेवा आणि विकास या मूल्यांवर विश्वास ठेवून केलेले कार्य जेव्हा राज्यस्तरावर ओळखले जाते, तेव्हा पुढील काळात अधिक प्रामाणिकपणे व निष्ठेने समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. तसेच आजच्या तरुण पिढीला सकारात्मक दिशा, आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारे कार्य उभे राहावे, हीच या सन्मानामागील खरी भावना असल्याचे त्यांनी सांगितले.या सन्मानासाठी त्यांनी शिव प्रतिष्ठान, पुणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला पाठिंबा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे, सहकाऱ्यांचे व शुभेच्छुकांचे आभार व्यक्त केले.“आपल्या सर्वांच्या सहकार्याने समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेत राहण्याचा माझा निर्धार आहे,” असे प्रतिपादन मुकेश कडाळे पाटील यांनी यावेळी केले.

राज्यस्तरीय महाराष्ट्र पुरस्कार २०२५ ने मुकेश कडाळे पाटील यांचा सन्मान*.                                                                                     
Previous Post Next Post