जुन्या पुलगावातील खून प्रकरण उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी – दोन आरोपी जेरबंद.. वर्धा : जुन्या पुलगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात ७ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले रामराव देवतळे (७०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसांत गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.फिर्यादी सतीष देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात इसमांनी देवतळे यांच्यावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर उपचारादरम्यान ९ डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला.तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की, मृतकाने सहा महिन्यांपूर्वी भावाच्या पत्नी व तिच्या नातेवाईकांवर हल्ला केल्याचा राग मनात धरून आरोपी गजानन काळे याने सूडाच्या भावनेतून साथीदार प्रविण वानखेडे व प्रज्वल खराणे यांच्या मदतीने देवतळे यांच्यावर हल्ला केला. संशयित आरोपी गजानन काळे हा रोहिणी शिवारात लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी प्रज्वल खराणे यालाही अटक करण्यात आली.दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी पुलगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई एएसपी सदाशीव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय विनोद चौधरी, उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, राहुल इटेकारपोलीस अंमलदार मनोज धात्रक, चंद्रकांत बुरंगे, महादेव सानप, अमोल नगराळे, मंगेश चावरे, विनोद कापसे, मंगेश आदे, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, व स्थानिक गुन्हे शाखेच्या वर्धा पथकाने केली.

जुन्या पुलगावातील खून प्रकरण उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी – दोन आरोपी जेरबंद..                                                                                       
Previous Post Next Post