पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल काँग्रेसचे शहराध्यक्ष यांची हकालपट्टी करावी :- मुदस्सर नज़र.... फैजपूर नगरपालिका निवडणूकीचा निकाल नुकतीच लागला त्यात काँग्रेसचे आठ पैकी पाच नगर सेवक निवडुन आले तिन उमेदवार अल्पमताने पराभूत झाले प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसच्या उमेदवार सुमय्या नाज मुदस्सर नज़र उमेदवार असताना काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख रियाज शेख साबीर यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष असताना सुद्धा पक्षाचे उमेदवार विरुद्ध काम केले त्या बद्दल त्यांची काँग्रेस पक्षातुन हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्रमांक तीन च्या उमेदवार सुमय्या नाज यांचें पति मुदस्सर नज़र यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांच्या कडे दुरध्वनी करुन केली आहे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाचे जळगाव जिल्हा प्रभारी मिर्जा आरीस बेग यांना तात्काळ या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देऊ असे आश्वासन दिले आहे तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार हे जिल्हा बाहेर असल्याने लेखी तक्रार करण्यासाठी सांगितले आहे व चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0