सिंधुदुर्ग मालवण येथील पंधराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत वर्धेतील बहीण भावाचे यश. (वर्धा प्रतिनिधी विपुल पाटील*)*मालवण:** सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे आयोजित पंधराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा २०२५ मध्ये वर्धा जिल्ह्यातील मधुरा भरत सायंकार आणि स्वरूप भरत सायंकार(११ ते १२ वर्ष वयोगट) यांनी दहा किलोमीटर सागरी जलतरण अवघ्या दोन तासांत यशस्वीपणे पूर्ण केले. १३ आणि १४ डिसेंबर २०२५ रोजी मालवण येथे पार पडलेल्या या स्पर्धेत आठ राज्यांतून १५०० हून अधिक जलतरणपटू सहभागी झाले, ज्यात या तरुणींची कामगिरी उल्लेखनीय ठरली. त्यांच्या यशाबद्दल त्यांना मेडल पदक, प्रमाणपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.मधुरा आणि स्वरूप यांच्या यशामागे वडील भरत सायंकाळ यांचे सतत प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि सरावासाठी दिलेली साथ मोलाची ठरली. या यशाने वर्धा जिल्ह्यातील जलतरण क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातील राष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या..

सिंधुदुर्ग मालवण येथील पंधराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत वर्धेतील बहीण भावाचे यश.                                     
Previous Post Next Post