.१४ जानेवारी रोजी गटसाधन केंद्रात महत्वाच्या बैठकीस उपस्थित रहा !गटशिक्षणाधिकारी )> मंगेश नरवाडे. (मानवत / प्रतिनिधी.)————————————मानवत येथे प्रजासत्ताक गणराज्य दिना निमित्त विद्यार्थ्यासांठी देशभक्तिपर कवायती साठी महत्वपूर्ण मार्गदर्शन शिक्षण विभाग, पंचायत समिती मानवत यांच्या कडून दिनांक १४ जानेवारी रोजी गटसाधन केंद्राच्या सभागृहामध्ये गटशिक्षणाधिकारी मा.श्री.मंगेश नरवाडे (पदवी शिक्षण अधिकारी) शिक्षण विभाग, पंचायत समिती मानवत हे करणार असून आदेशीत केलेल्या शाळेतील मुख्याध्यापक यांनी वेळेवर महत्व पूर्ण बैठकीस उपस्थित रहावे असे आवाहन मानवत गटसाधन केंद्राच्या वतीने करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की मानवत गटसाधन केंद्राच्या वतीने दिनांक १४ जानेवारी मानवत पंचायत समीतीचे गट शिक्षणाधिकारी यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनाखाले बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व आदेशीत मुख्याध्यापक प्राचार्य, के.के.एम. के.एम.व्ही. मानवत, 02. प्राचार्य, राजश्री शाहू के.एम.व्ही. मानवत, 03. मुख्याध्यापक, नेताजी सुभाष मा. वि. मानवत, 04. मुख्याध्यापक, के.जी.बी.व्ही. मानवत. 05. मुख्याध्यापक, पी.एम.श्री. के.पी.एस. मानवत., 06. मुख्याध्यापक, श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कब्रुवार वि. मानवत, 07. मुख्याध्यापक, श्रीमती रामकंवर द्वारकादास लड्ड वि. मानवत, 08. मुख्याध्यापक, खान अब्दुल गफार खान उर्दू वि. मानवत09. मुख्याध्यापक, श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील वि. मानवत, 10. मुख्याध्यापक, इकरा उर्दू प्रा. स्कूल मानवत यांनी दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देश भक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यासाठीच्या नियोजन बैठकीस उपस्थित राहावे असे आदेश मा.शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र परोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, उपरोक्त संदर्भान्वये दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेणे बाबत सुचित करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने सुधारीत सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.संदर्भीय पत्रात दिलेल्या सुचनानूसार मानवत तालुक्यात दिनांक 26 जानेवारी 2026 या देशाच्या प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्यासाठी नियोजन बैठकीचे आयोजन दिनांक 14/01/2026 रोजी गटसाधन केंद्र मानवत येथे दुपारी 12-30 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तालुक्याचा सामूहिक कवायत कार्यक्रम उत्तमोत्तम होण्यासाठी सदरील बैठकीस आपण व आपले अधिनस्त क्रिडा शिक्षक तसेच सांस्कृतीक विभाग प्रमुख यांचेसह अगदी वेळेवर उपस्थित राहावे. विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन गटशिक्षणाधिकारी मंगेशजी नरवाडे पंचायत समिती मानवत यांनी केले आहे..
byमीडीया पोलीस टाईम
-
0