दिनांक 09/01/2026 रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार मा. वरीष्ठाचे आदेशाने वाँश आउट मोहीम राबवित असतांना मुखबीरकडून खात्रीशीर खबर मिळाली की, अनिता भोसले रा. तरोडा पारधी बेडा ही तिचे घराचे मागील बाजुस असलेल्या खाली जागेत झाडाझूडूपामध्ये अवैद्यरित्या गावठी मोहा रसायान सडवा गाळीत आहे, अशी मुखबीरकडून खात्रीषीर माहिती मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण पथकचे अंमलदार हे खाजगी वाहनाने रवाना होवून मोक्यावर पोहचून पाहणी केली असता मोक्यावर 1) 4 मोठे प्लाँल्टीक ड्रममध्ये प्रती लिटर 200 लिटर प्रमाने 800 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रती लिटर 80 रू प्रमाने 64,000 रू 2) 12 लहान प्लाँस्टीक ड्रममध्ये प्रती लिटर 100 प्रमाने 1200 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा प्रती लिटर 80 रू प्रमाने 96,000 रू 3) जमीनीत गाडुन असलेले 10 प्लाँस्टीक ड्रम मध्ये अंदाजे 100 लिटर प्रमाणे 1000 लिटर कच्चा मोहा सडवा प्रती लिटर 80 रू प्रमाने 80,000 रू 4) 22 छोटे प्लाँस्टीक ड्रम प्रती ड्रम 300/- रू प्रमाणे 6,600/- रू 5) 4 मोठे प्लाँस्टीक ड्रम प्रती ड्रम 400 रू प्रमाने 1600 रू असा एकुण जुमला किमत 2,48,200 रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्ती पंचनामा कार्यवाही करून सदर माल जागीच नाश करून सदर महिला आरोपीविरूध्द दारूबंदी कायदयान्वये गुन्हा नोंद केला- ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक साहेव सा., मा.पोलीस निरीक्षक अनिल राऊत सा. हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना राजेश शेंडे, पोशी आशिष नेवारे,पो.शि. रोहीत साठे, पोशी मंगेश वाघमारे यांनी केली. सदर गुन्हयांचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करत आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0