*मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमार्तगत सौ. रामकंवर द्बारकादास लड्डा विद्यालयास तपासणी पथकाची भेट*. (मानवत / अनिल चव्हाण.)—————————"डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत"मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा टप्पा या उपक्रमार्तगत सौ रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी विद्यालयामध्ये केंद्रस्तर पथकाची तपासणी यावेळी पथकातील प्रमुख सन्माननीय प्रकाशजी मोहकरे सर ( केंद्रप्रमुख तथा मुख्य पथक प्रमुख) सन्माननीय पाटील सर(केंद्रस्तर पथक प्रमुख )सन्माननीय सचिन गिरी सर(केंद्रस्तर पथक प्रमुख )वरील मान्यवरांच्या हस्ते तपासणी दरम्यान विद्यालयातील शैक्षणिक कामकाज, प्रशासकीय दप्तर आणि शाळे मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची बारकाईने पाहणी करण्यात आली. यावेळी शाळेचा परिसर, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्दल पथक प्रमुखांनी विशेष समाधान व्यक्त केले. विद्यालयाच्या प्रगतीचा आलेख पाहून मान्यवरांनी शालेय व्यवस्थापनाचे व शिक्षकांचे कौतुक केले. मान्यवरांचे विद्यालयाच्या गौरवशाली परंपरेला साजेसा उपक्रम 'ग्रंथरुपी पुस्तक' भेट देऊन सन्मान करण्यात आला.*
byमीडीया पोलीस टाईम
-
0