दैनिक अल्हीलाल समूहाचे वतीने स्वर्गीय जफर खान नाज यांचे स्मरणार्थ दिले जाणारे राज्यस्तरीय नाझ-ए-सहाफत पत्रकारिता पुरस्कार करितालातूर येथील ज्येष्ठ पत्रकार म. मुस्लिम कबीर यांची निवड.. बीड (संघर्ष वार्ता) दि.09/01/2026 बीड जिल्ह्यातील भाषिक पत्रकारितेचे शिल्पकार व सायंकाळ दैनिक वर्तमानपत्राचे जनक स्वर्गीय जफर खान नाझ यांचे पुण्यस्मरणात दरवर्षी राज्यस्तरीय नाझ ए सहाफत पत्रकारिता पुरस्कार देऊन राज्यातील नामवंत व गुणवंत पत्रकारांना गर्विन्यात येते. यंदा हे कार्यक्रम ३१ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून यावर्षीचे जफर खान नाझ राज्यस्तरीय नाझ-ए-सहाफत पुरस्कार करिता लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार म. मुस्लिम कबीर यांची निवड करण्यात आली आहे.म. मुस्लिम कबीर हे १९९५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध वर्तमानपत्र मासिक व साप्ताहिक आधारे पत्रकारितेला उजाळा देण्याचे काम केला आहे त्यांचे नाव फक्त लातूर जिल्ह्यापर्यंत सीमित नसून त्यांनी राज्य स्त्रीय पत्रकारिता करून लातूर जिल्ह्याचे केले असून त्यांचे कार्याची दखल घेऊन दैनिक अल्हीलाल समूह च्या वतीने यावर्षीचे जफर खान नाझ राज्यस्तरीय नाझ-ए-सहाफत पुरस्कार करिता म. मुस्लिम कबीर यांची निवड करण्यात आली असून येणारे ३१ जानेवारी रोजी आयोजित भव्य दिव्य पुरस्कार सोहळा कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

दैनिक अल्हीलाल समूहाचे वतीने स्वर्गीय जफर खान नाज यांचे स्मरणात दिले जाणारे राज्यस्तरीय नाझ-ए-सहाफत पत्रकारिता पुरस्कार करितालातूर येथील ज्येष्ठ पत्रकार म. मुस्लिम कबीर यांची निवड..                               
Previous Post Next Post