समाजकार्याच्या जोरावर प्रभाग क्रमांक ८ (अ) मध्ये सोनल देवतळे यांचा जनसंपर्क अधिक मजबूत.. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.10 :-चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२५,२६ साठी वडगाव प्रभाग क्रमांक ८ (अ) मधून सोनल प्रकाश देवतळे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.सामान्य कुटुंबातून आलेल्या सोनल देवतळे यांनी आई, सून आणि लेक या भूमिका निभावताना परिसरातील नागरिकांच्या रोजच्या अडचणी जवळून पाहिल्या आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, महिलांचे प्रश्न आणि शिक्षणाशी संबंधित समस्या त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या असून त्यावर मदत करण्यासाठी त्या सातत्याने सक्रिय राहिल्या आहेत.राजकारणात येण्यापूर्वीच त्यांनी सामाजिक कार्यातून नागरिकांशी थेट संपर्क ठेवला. लोकांच्या तक्रारी ऐकून घेणे, प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आणि गरजू नागरिकांना मदत मिळवून देणे या कामामुळे प्रभागातील मतदारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.आगामी निवडणुकीत मोठ्या घोषणा न करता आतापर्यंत केलेल्या कामाच्या आधारे त्या मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. समाजकार्याच्या जोरावर प्रभाग वडगांव क्रमांक ८ (अ) मध्ये सौ सोनल प्रकाश देवतळे यांचा जनसंपर्क अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0