.*एका कठोर शब्दाने महाभारत घडले तेव्हा अमृतमय शब्दांचा वापर करा...**@)>स्वामी रामदयालजी महाराज*. (मानवत / अनिल चव्हाण.)———————————आपल्या व्यवहारांमध्ये नेहमी अमृतमय शब्दाचा वापर करा एका कठोर शब्दाने महाभारत घडले असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदाय शहापुरा धाम राजस्थानचे चौदावे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी मानवत येथील रामस्नेही संप्रदायाच्या रामबाडामध्ये सप्तदिवशीय आध्यात्मिक सत्संग महोत्सव आयोजन प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.*रामस्नेही* संप्रदाया बद्दल युवकांना वयोवृद्धांना चांगली माहिती होणे आवश्यक आहे. रामस्नेही संप्रदायाचे जन्मदाता स्वामी श्री रामचरणजी महाराज यांनी आपल्या अनुभवावरून अनुभव वाणी ग्रंथाची रचना केली. अनुभववाणी हे अलौकिक ग्रंथ आहे.ज्या ग्रंथाचे स्वाध्याय प्रबळ आहे ते शक्तिशाली ग्रंथ आहे. ग्रंथ हे अज्ञानरूपी ग्रंथीचे खंडन करणारे अवलोकिक ग्रंथ आहे. स्वामी रामचरणजी महाराज यांनी आपल्या अनुभववाणी ग्रंथातून आपल्या गुरुपुढे जाताना शिष्याने नम्रतेने व अहंकाराचा त्याग करून नतमस्तक होऊन जावे याची शिकवण दिली.हे आमच्या महापुरुषांचे संस्कार आहे. हा एक प्रकारचा भाव आहे आपण आपल्या आराध्य देवतांना जसे नतमस्तक होऊन प्रणाम वंदन करतो तसेच प्रणाम वंदन आपल्या गुरूंना आई-वडिलांना करा गुरु समोर जाताना आपल्यातील अहंकार काढूनच मग जा. आपल्या पवित्र संस्कृतीमध्ये पाच प्रकारचे वंदन प्रणाम आहे. ही आपली परंपरा आहे. परंतु आपण जाणून बुजून टाळत आहोत. आपल्यातील अज्ञानाने व अहंकाराने हेतू पुरस्फर टाळत आहोत. आपल्या गुरूच्या माघारी कठोर शब्दाचा वापर करू नका. आपल्या उत्पन्न होणाऱ्या भाव ने आपण जगाकडे पाहत नाही. आपण आपल्यातच पाहत आहोत. आपले कार्य इमानदारीने करत नाहीत. तन- मनाने गुरूंना शरण जा वंदन करा त्यांच्यापुढे नतमस्तक व्हा हात जोडा अहंकाराचा त्याग करूनच गुरूच्या चरणी जा. सौंदर्याचा, संपत्तीचा, सत्तेचा, व शक्तीचे,अहंकार करू नका.जो पर्यंत आपले शरीर सशक्त आहे. तो पर्यंत ईश्वराचे नामस्मरण करा देवदर्शनासाठी मंदिरात जा आपण या अवस्थेमध्ये विसरत आहोत. ज्यावेळी आपले शरीर साथ देत नाही तेव्हा आपणाला देवाची आठवण येते. आपल्या गुरूंच्या प्रति अनन्य भाव उत्पन्न करा त्यांचा आदर करा. आपल्या अहंकाराने व स्वार्थीपणा मुळे आपल्या शरीराला धोका देत आहोत. आपली चिंता न करता दुसऱ्यांची चिंता करा यातच आपले कल्याण आहे. आपल्या स्वार्थासाठी समाजात आपली प्रतिष्ठा वाढावी यासाठी आपण प्रयत्न करतो यासाठी पैशाचा उधळपट्टी करतो. आपल्या मनाला दुःख देऊ शकतो परंतु त्यांची वेदना काय आहे हे आपण समजू शकत नाही. राजाने प्रजेचे दुःख आणि प्रजेने राजाचे दुःख जाणावे.त्या दिवशी एक इतिहास निर्माण होईल. आपल्या स्वार्थाच्या पूर्ततेसाठी आपण मोठे अनर्थ कार्य करतो.कार्य करण्यासाठी व्यक्ती स्वतंत्र आहे. याचे परिणाम भोगण्यासाठी व्यक्ती परतंत्र आहे. आपल्या व्यवहारात नेहमी अमृतमय वाणी शब्दांचा वापर करा. एका कठोर अपमान जन्य शब्दाने महाभारताला जन्म दिला. द्रोपदी ने दुर्योधनाचा अपमान करताना अंधे का बेटा अंधा ही होता है. या कठोर शब्दावरून महाभारत घडले. संत कबीर यांनी आपल्या वाणीतून. अशा शब्दा चा वापर करून जे मधुरमय विनम्र खरे आणि हितकारी असावे. ज्या शब्दाने ऐकणाऱ्याना सुख आणि शांती मिळावी.**हैसी वाणी बोलिये. मन का आपा खोल. औरंण को शितल करे आप हो शीतल होय...**कारण या शब्दाने स्वतःच्या मनाला शांती मिळते आणि दुसऱ्यांच्या मनाला शांती मिळून चांगले संबंध निर्माण होतात. कटू आणि कठोर शब्दाने एक प्रकारची जखम देत सामाजिक क्षेत्रा पासून दूर लोटल्या जातो. काय आहे गीता. गीता ही परमात्म्याच्या हृदयातून निर्माण झालेली पवित्र गीता आहे.मानवत च्या पवित्र रामबाडाच्या संतश्री ब्र. भगतरामजी महाराज सत्संग भवनातून गीताचे महत्त्व सांगताना अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेमध्ये सर्व प्रवासी जळून खाक झाले होते. परंतु या विमान दुर्घटनेमध्ये एक छोटीशी गीता जशीच्या तशी आढळून आली.इतकी महान आहे. परमात्म्याच्या हृदयातून निघालेली गीता. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदायाचे शहापुरा धाम के पीठाधीश्वर जगद्गुरु 1008 श्री रामदयालजी महाराज यांनी येथील राम शिंदे संप्रदायाच्या रामबाडा मधील ब्र..संतश्री भगत राम जी महाराज सत्संग भवन मध्ये आयोजित सप्तदिवशीय आध्यात्मिक प्रवचन महोत्सवाच्या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना सांगितले.***

एका कठोर शब्दाने महाभारत घडले तेव्हा अमृतमय शब्दांचा वापर करा...**@)>स्वामी रामदयालजी महाराज*.                                                                                     
Previous Post Next Post