नवीन वर्षा निमित्त मुजूभाई सय्यद, यांनी केले विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड: बिलोली तालुक्यातील,हिप्परगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नववर्षानिमित्त सामाजिक कार्यकर्ते, व वंचित बहुजन आघाडीचे शाखा अध्यक्ष व शालेय समितीचे उपाध्यक्ष सय्यद मुजूभाई,व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर,यांच्याकडून विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आले, यावेळी उपस्थित शाळेतील सर्व विद्यार्थी, व शाळेचे केंद्रप्रमुख नाईक सर, पत्रकार मारोती एडकेवार, डॉ. अण्णा भाऊ साठे अभ्यासिका वाचनालयाचे ग्रंथपाल, राजू पिराजी अंजनीकर. ग्रामपंचायत सेवक सुनील अंजनीकर, व अजय कोंडलाडे सर,गायकवाड सर,ग्रामपंचायत सदस्य शेख गौस ,सेवक भिमराव एडकेवार व सर्व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांचं,नववर्षानिमित्त शाळेकडून सर्वांचे स्वागत करण्यात आले. नवंवर्षा निमित्त एकमेकांना,शुभेच्छा चा वर्षाव झाला,व सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करण्यात आले. हिप्पारगा थडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 1/1/2026 नवीन वर्षाची सुरुवात एकमेकांच्या शुभेच्छांनी गोड गोड पदार्थाने झाली.

नवीन वर्षा निमित्त मुजूभाई सय्यद, यांनी केले विद्यार्थ्यांना  खाऊचे वाटप.                                                                           
Previous Post Next Post