सामूहिक विवाह सोहळा मधे 12,नवरदेव नवरींचा लग्न संपन्न झाला आहे ..................................... अल खिदमत फाउंडेशन, हिंगणघाट यांच्या वतीने आयोजित “ईज्तेमाई शादी” या सामूहिक मुस्लिम विवाह सोहळ्याला वर्धा जिल्हा चे खासदार अमर काळे साहेब,हिंगणघाट नगर पालिका नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुडसकर, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट सभापती ऍड सुधीर कोठारी साहेब,उपस्थिती दर्शविली..!📅 दिनांक : ११ जानेवारी २०२६📍 स्थळ : ईज्तेमाई शादी ग्राउंड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जामा मस्जिद जवळ, हिंगणघाटगरजू मुस्लिम कुटुंबांसाठी दिलासा देणारा, साधेपणा व सन्मान जपणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देणारा आहे. कमी खर्चात विवाह सोहळे पार पाडत सामाजिक ऐक्य आणि परस्पर सहकार्याची भावना दृढ करण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. या सोहळ्यामध्ये जिमी टेक्स हिंगणघाट चे फॅक्टर मैनेजर शाकिर खान पठान साहेब, उमेश तुडसकर जी, रोटरी क्लब मित्र परिवार, हाजी इब्राहीम बख्श वकील साहेब,हाजी मो रफीक पत्रकार, माजी नगर सेवक प्यारू कुरैशी, अमोल बोरकर, प्रशांत लोणकर, सगळे समाजाचे प्रमुख्य लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे. जामा मस्जिद चे इमाम साहेब यांनी विवाह सोहळा ची सुरुवात केली नवरदेव नवरी ना आपला आशीर्वाद दिला देश मध्ये शांती कायम राहो ही प्रार्थना केली आहे.या स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी अल खिदमत फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलीस टाईम विभागीय उपसंपादक

सामूहिक विवाह सोहळा मधे 12,नवरदेव नवरींचा लग्न संपन्न झाला  .....................................               
Previous Post Next Post