निंभोरा ठाण्याचे स. पो. नि. मीरा देशमुख ॲक्शन मोडवर,,, अवैध धंद्या वाल्यांचे धाबे दणाणले, आरोपीतांचे कोंबिंग ऑपरेशन, (विशेष जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद कोळी) दि. 13/01/2026 रोजी भल्यापहाटेच निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील निंभोरा-विवरा, तांदलवाडी, खिर्डी, ऐनपूर, निंबोल व आंदलवाडी दसनूर या बीट मधील असणारे पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील सवयीचे गुन्हेगार,हिस्ट्रीशीटर,दोन पेक्षा अधिक दाखल गुन्हे असणारे, अवैध गौण खनिज वाहतूक करणारे, अवैध दारू वाहतूक व विक्री करणारे , शरीराविरुद्धचे व मालाविरुद्धचे गुन्ह्यातील आरोपीतांना समक्ष पोलीस ठाण्यात हजर करण्यात येऊन निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील शेतातील शेती उपयोगी वस्तू तोलकाट्यावरील इलेक्ट्रॉनिक वस्तू, शेत पिकाचे नुकसान तसेच केबल चोरी याअनुषंगाने होणाऱ्या गुन्ह्यांबाबत आरोपीतांना विचारपूस करून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा या उद्देशाने सुमारे 35 ते 40 आरोपींची झाडाझडती घेवून तंबी देण्यात आली. सदर कोंबिग ऑपरेशनची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक, डॉ. महेश्वर रेड्डी यांचे आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक, अशोक नखाते व फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी, अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, मीरा देशमुख सोबत पो.स्टेचे पोलीस अधिकारी व अंमलदार स्टाफ आदींनी प्रभावीपणे कोंबिंग ऑपरेशन राबविले. सदरची कार्यवाही ही हद्दीतील गुन्हेगारीला प्रतिबंध बसावा म्हणून निंभोरा पोलीसांकडून राबविण्यात आलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे आरोपींचे व अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले. शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल स. पो. नि. मीरा देशमुख,,, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर त्याचबरोबर अवैध धंदे करणाऱ्यांवर व शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य व शेतमालाचे नुकसान करणारे व्यक्तींची हयगय केली जाणार नाही असा कडक इशारा निंभोरा पोलीस ठाण्याचे महिला पोलीस अधिकारी स. पो. नि.मीरा देशमुख यांनी दिला आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0