विद्यार्थी गूणवत्ता व मूल्यवर्धन उपक्रमाची नरवाडे यांनी केली पाहणी. (मानवत / अनिल चव्हाण.) —————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयास आज दिनांक १४ जानेवारी रोजी मा.प्रविणजी नरवाडे यांनी नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयास भेट.देऊन विविध उपक्रमाची पाहणी केली.सविस्तर वृत्त असे की,मानवत येथील नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयासआज दिनांक 14 जानेवारी रोजी शांतिलाल मुथा फाऊंडेशन मा. श्री. प्रवीणजी नरवाडे, मानवत तालुका समन्वयक, (शांतीलाल मुथा फाउंडेशन) यांनी आज नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालय मानवत येथे भेट देऊन पाहणी केली.यावेळी मा.श्री. प्रवीणजी नरवाडे यांनी प्रथमत मूल्यवर्धन कार्यक्रम व त्यांची शालेय स्तरावर होत असलेली अंमलबजावणी संदर्भात आढावा घेऊन माहिती घेतली.याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांना कृती गीताच्या माध्यमातून मूल्यवर्धन उपक्रमांची माहिती दिली. विद्यालयातील इयत्ता चौथीच्या वर्गात मा. श्री. श्रीहरी कच्छवे सरांनी विभाग 2 : स्व जाणीव अंतर्गत "भावना " हा उपक्रम घेतला. यामध्ये विद्यार्थ्यांना कवितेच्या माध्यमातून भावना कशा जागृत होतात हे उदाहरणं द्वारे सांगितले व कवितेत भावनांचे वर्णन करण्यास सांगितले. घरातील व्यक्तीं एकापेक्षा जास्त कोणत्या भावना अनुभवत असतात, ही घरी करावयाची कृती विद्यार्थ्यांना दिली. हे पाहून नरवाडे सरांनी कौतुक केले.वर्गात शांतता संकेत, वर्गचर्चा, प्रभावी वर्ग व्यवस्थापन यांचा वापर व वर्ग नियम दर्शनी भागात पाहून प्रोत्साहन दिले. एकंदरीत नेताजी सुभाष प्रा.शाळा मानवत येथील विद्यार्थी गुणवत्ता व मूल्यवर्धन उपक्रम याबाबत श्री प्रवीण नरवाडे सरांनी समाधान व्यक्त केले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0