महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. शाखा भद्रावती दिनदर्शिकेचे आ. करण देवतळे यांच्या हस्ते विमोचन..!(महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती,वरोरा दि.13:- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या जिल्हा शाखा चंद्रपूर व तालुका शाखा भद्रावती यांच्या वतीने जिल्हा व तालुका २०२६ पत्रकार दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. वरोरा, भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण संजय देवतळे यांच्या हस्ते दिनदर्शिका प्रकाशित झाली.पत्रकार संघाकडून दरवर्षी जिल्हा व तालुक्याची उपयुक्त माहिती एकत्र करून दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. यावर्षीच्या २०२६ दिनदर्शिकेत जिल्हा व तालुका पत्रकार संघाची रचना, पदाधिकारी, संपर्क क्रमांक, महत्त्वाची शासकीय कार्यालये, राष्ट्रीय व सामाजिक महत्त्वाचे दिवस तसेच पत्रकारांसाठी आवश्यक माहितीचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी आमदार देवतळे यांनी पत्रकारांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. जनतेचे प्रश्न मांडणे व प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे काम पत्रकार सातत्याने करत असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संघाच्या उपक्रमांना पुढील काळातही सहकार्य राहील, असे त्यांनी नमूद केले. या प्रसंगी जिल्हा व तालुका पातळीवरील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली. २०२६ दिनदर्शिका पत्रकारांच्या दैनंदिन कामकाजात उपयुक्त ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई. शाखा भद्रावती दिनदर्शिकेचे आ. करण देवतळे यांच्या हस्ते   विमोचन..!
Previous Post Next Post