राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी. (महेश निमसटकर जिल्हा विभागीय संपादक भद्रावती ) भद्रावती. दि.13:- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील कार्यालयात राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान असलेल्या स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन पुजन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दोघांच्याही जिवनचरीत्रांवर प्रकाश टाकला.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाज शेख, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष रोषण कोमरेड्डीवार, नगरसेवक फय्याज शेख, महिला अध्यक्ष साबीया देवगडे, अमोल बगडे,शुभम बगडे, विजय कावळे, बिपीन देवगडे, जाहीर पठाण,आसीफ शेख,शुभम नागोसे, आकीफ खाण,प्रवीण सींग,अफरोज आदी उपस्थीत होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0