अख्खा गाव विकल्याची चर्चा, ग्रामपंचायत सभेत पुन्हा गदारोळ वेकोली प्रशासन व ग्रामपंचायत चे संघमत नागरिकांचे आरोप! (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) भद्रावती.दि.17:- भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठी गर्भश्रीमंत ग्रामपंचायत म्हणहून नवलौकिक असलेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत माजरी येथील स्थानिक नागरिकांनी पुन्हा गदारोळ केला.या गदारोळाचे नेमके कारण ग्रामपंचायत सचिवानी अख्खा गाव वेकोली प्रशासनासोबत संघमत करून विकल्याची चर्चा माजरी परिसरात सद्यस्थितीत जोरात सुरु आहे. सन 2011 मध्ये वेकोली प्रशासनाने कॉलरी परिसरातील यु. जी. टू. ओ. सि. नागलोन खाणीसाठी भूमी अधिग्रहणसाठी प्रस्ताव झाला होता दरम्यान सन 2011या कार्यकाळात ग्रामपंचायत सचिव राजेंद्र गणवीर हे कार्यरत होते. दरम्यान या काळात वेकोली च्या अधिग्रहण कालावधीत अटीशर्थी पूर्ण न करता अधिग्रहण झाल्यावर नागरिकांनी अक्खा गाव विकून वेकोलीशी मिळून भ्रटाचार केला असा आरोप नागरिकांनी केला आहे. सद्यस्थित वेकोली प्रशासन ने आपली मुजोरी कायम ठेवत भूमी अधिग्रहण सुरु केले असून स्थानिक नागरिकांच्या कोणत्याही अटीशर्थी पूर्ण न करता जुन्या मोबदल्यात अधिग्रहण करणे सुरु केले आहे नागरिकांनी दिनांक 13/1/2026 रोजी झालेल्या ग्रामपंचायत च्या विशेष सभेत गावातील 249 नागरिक उपस्थित असून या सर्व गावाकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर ताशेरे ओढले, आणि चांगलाच गदारोळ केला. तदनंतर ग्रामपंचायत माजरी येथील नागरिकांनी विशेष सभेत गंभीर आरोप करत ग्रामपंचायत ठरवाअंतर्गत त्यामध्ये वेकोली व ग्रामपंचायत प्रशानाने प्रकल्पग्रस्त नागरिकांना सेक्शन 4,7,9,11 याबद्दलची पूर्वकल्पना कल्पना दिली नाही तसेच जमिनीचा मोबदला जुन्या देयकनुसार न देता नवीनआजच्या बाजारभाव नुसार देयके असावीत.सदर जमिनीचा मोबदला देतांना स्वतंत्र सर्व्हेक्षण समिती स्थापन करून याची माहिती सर्व नागरिकांना द्यावी.प्रकल्पग्रस्त नागरिकांचे वेकोली प्रशासनाने पुनर्व्हसन करवून प्रति मकान धारकांना 1500 चौ. फूट जागा देण्यात यावी.तसेच पुनर्व्हसन केलेल्या जागेवर पाणी, आरोग्य, शिक्षण,व उपजीविका या मूलभूत सुविधा वेकोली प्रशासनाने पुरवाव्यात अशी मागणी ग्रामपंचायत ठरवात स्थानिक नागरिकांनी आवर्जून केली.व्हर्जन :- ग्रामपंचायत सचिव राजेंद्र गणवीर 2011 या कार्यकाळात माजरी ग्रामपंचायत ला कार्यरत असून त्यावेळी झालेला ठरवात आम्ही जनतेचे हित जोपासून नागरिकांच्या मूलभूत गरजा, पुनर्व्हसन आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त यांना रोजगार मिळावा अश्या अटी व शर्थी नंतरच आम्ही भूमी अधिग्रहणसाठी कार्यालयीन मंजुरी देऊ असे नमुद आहे. माझ्यावर लावले आरोप हे बिनबुडाचे असून मी ते मान्य करत नाहीत.व्हर्जन :-सरपंच छाया जंगम :- सन 2011 मध्ये पद व कार्यभार माझ्याकडे नसल्याकरणाने मला याबाबतची सविस्तर माहिती नाही.व्हर्जन:- प्रकल्पग्रस्त राजेश शालिकराम कोहळे माजरी ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार नियमित भोंगळ असल्यामुळे ह्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.सन 2011 मधील जुन्या ठरावानुसार नागरिकांना अंधारात ठेवून सर्व अधिग्रहण झाले याबाबत ची सविस्तर माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांनी दिली नाही. नवीन झालेल्या ग्रामपंचायत च्या विशेष सभेत नागरिकांनी केलेल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत..

अख्खा गाव विकल्याची चर्चा, ग्रामपंचायत सभेत पुन्हा गदारोळ वेकोली प्रशासन  व ग्रामपंचायत चे संघमत नागरिकांचे आरोप!                                                                                          
Previous Post Next Post