**शरद मधूकर सदाफळे* यांच्या वतीने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यासाठी बाल वाचनालयास पूस्तके भेट..... (मानवत / अनिल चव्हाण. ) ————————————पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस जय वैष्णवी माता एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शाळेतील बाल वाचनालयास पुस्तकांची भेट देण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, मानवत येथे दिनांक 17 जानेवारी रोजी जय *वैष्णवी माता* एज्युकेशन सोसायटी खेर्डा (गं.कि ) तालुका पाथरी या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या वतीने शालेय बाल वाचनालयासाठी पुस्तकांची भेट देण्यात आले. संस्थेचे सचिव मा. शरद मधुकर सदाफळे यांनी विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शन केले. आणि वाचन संस्कृती करियर घडू शकते. आजच्या स्पर्धेच्या युगात वाचनाची सवय असल्यास यश सहज मिळू शकते असे ते यावेळी म्हणाले. यावेळी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. माणिकरावजी घाटूळ सर यांच्याकडे विद्यार्थ्यांसाठी पुस्तके सुपूर्द केली. याप्रसंगी सुशील लाड, उदय जैन, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संधीचं सोनं करण्याची किमया वाचन संस्कृतीत आहे असे उदय जैन यांनी सांगितले. तसेच *"मी ज्ञानी होणार "* या परीक्षेतील पाथरी आणि मानवत या दोन्ही तालुक्यातून प्रथम पाच आलेल्या तितिक्षा दहे, चैतन्य बोलेवार, समृद्धी कोटलवार, केतकी पवार आणि ओवी गाढवे विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतूक व सन्मान करण्यात आला. जिजाऊ जयंती निमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना उदय जैन यांच्या वतीने बक्षीस वितरित करण्यात आले. आयुष हजारे, सोनाली भक्ती, वैष्णवी जाधव, शिवम कोंडगिर, सायली दहे, श्रद्धा चव्हाण, रोहन भाले, समर्थ गोजे, आर्या बोरबने, गायत्री नायबळ, प्रथमेश धारवाडकर, भक्ती दिनेश, माणिक मोकरे, ऋतुजा माने आणि कृष्णा गडदे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच टीईटी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल संदीप काळे सर, अमोल पाटील सर आणि मनोज वांगीकर सर या शिक्षकांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पवार सर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर निपाणीकर सर यांनी केले. राजाभाऊ एडके सर यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.***

शरद मधूकर सदाफळे* यांच्या वतीने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यासाठी बाल वाचनालयास पूस्तके भेट.....                          
Previous Post Next Post