भद्रावती तालुका क्रीडा संकुलातील समस्यांची तात्काळ सोडवणूक करा.. जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन*. ( महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.20:- राष्ट्रीय असो वाआंतरराष्ट्रीय स्तरावर मैदानी खेळ अथवा इनडोअर खेळ याला विशेष प्राधान्य देऊन गावपातळीपर्यंत खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयातर्फे जिल्हा, तालुका स्तरावर करोडो रुपये खर्चून क्रीडा संकुल उभारल्या गेले. अद्यावत जीम, इमारत प्रशस्त मैदान निर्माण केल्या गेले. भद्रावती शहरात सुद्धा मोठ्या गाजावाजा करून क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. इमारत , मैदान , व्यायाम साहित्य बसविण्यात आली त्यामुळे शहरासह तालुक्यातील सर्व क्रीडा प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. अनेक खेळाडू सराव करून राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवू लागले. पोलिस व सैन्य भरती करिता ते अधिकाधिक प्रोत्साहित होऊ लागले मात्र अलीकडे या क्रीडा संकुलाची व तेथील साहित्याची वाताहत होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. क्रीडांगणात मोठ मोठे खड्डे पडले आहेत, डुकरे, गुरे ढोरे यांचा वावर नित्याचा झाला आहे तसेच शौचालय कुचकामी पडले आहेत अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी युवकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे तद्वतच या ठिकाणी रात्री बेरात्री असामाजिक तत्वांचा वावर वाढला असल्याने या सर्व बाबीची दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार यांनी या संकुलाची व मैदानाची, जीम साहित्याची योग्य निगा व देखभाल करण्यात येऊन हे क्रीडा संकुल अद्यावत करण्यात यावे या मागणीचे निवेदन दिनांक १९ जानेवारी रोजी चंद्रपूर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले आहे. संलग्नित प्रत क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांना देऊन इथल्या समस्या सोडवून स्थानिक खेळाडूना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. निवेदन सादर करते वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बिपीन देवगडे, शुभम बगडे, प्रथम शेंडे , विजय डोंगरे, प्रमोद वावरे , अमोल बडगे, नौशाद अली, अख्तर अली, प्रवीण सिंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भद्रावती तालुका क्रीडा संकुलातील समस्यांची तात्काळ सोडवणूक करा.. जिल्हाध्यक्ष रोशन कोमरेड्डीवार*राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदन*.                                                                          
Previous Post Next Post