होमगार्ड वर्धापन दिनाचा सप्ताह उत्साहात साजरा* वर्धा : 79 वा होमगार्ड व नागरी संरक्षण दलाचा सप्ताह दिनांक 24 , 12 , 2025 ते 31 12 2025 या कालावधीमध्ये जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र शांती स्तूप लक्ष्मीनगर या ठिकाणी सदाशिव वाघमारे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षण शिबीर यामध्ये 70 पुरुष होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त सलग कवायती करिता महिला होमगार्ड 35 सहभागी होते दिनांक 31 ,12 ,2025 रोजी होमगार्ड वर्धापन दिवसाचा निमित्याने पथ संचालनाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये जिल्हा समादेशक होमगार्ड यांना सशस्त्र मानवंदना व होमगार्ड यांनी रक्तदान करून रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी फार मोलाची कामगिरी केली त्याबद्दल आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 100% होमगार्डची पूर्तता होत असते भविष्यात अशाच प्रकारे कार्य करून होमगार्ड संघटनेचे नाव आणखीन उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होमगार्ड संघटनेची स्थापना ६ डिसेंबर 1946 साली मुंबई शहरात झाली जनतेतून जनतेची सक्षम संरक्षण करण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी होमगार्ड संघटनेच्या जवानांकडून पोलीस यंत्रणेला भरभरून मदत होत असते मुंबई शहरात होमगार्ड संघटनेची स्थापना करून एक छोटसं संघटना रुपी रोपट स्वर्गीय मोरारजी देसाई यांनीच तयार केलं व आज या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर वटवृक्षामध्ये झालं म्हणजे आज ही संघटना देशपातळीवर कार्य करीत आहे असे महत्त्वपूर्ण उद्गार जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी आपले मार्गदर्शनातून व्यक्त केले तर यावेळी महामहिम राष्ट्रपती यांचे संदेश वाचून बाबा तुरक वरिष्ठ फलटण नायक यांनी केले तसेच सन 2025 मध्ये सेवानिवृत्त मानसेवी अधिकारी मधुकर बागेश्वर , सुरेश कोपरकर , उमेश कांबळे , रेखा मानवटकर यांचे सत्कार करण्यात आले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप बलवीर यांनी केले सदर सप्ताहामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले शिवमंदिर लक्ष्मीनगर या परिसरात स्वच्छता अभियान राबवून तेथील नगरपरिषद सदस्य विलास आगे यांची विशेषतत्त्वाने मदत झाली समाजामध्ये स्वच्छतेचा व साफसूत्रतेचा संदेश दिला तसेच रक्तदान शिबिर त्यामध्ये 22 पुरुष व महिला होमगार्डन रक्तदान करून एक प्रकारे रुग्णाचे जीव वाचविण्यासाठी फार मोलाची कामगिरी केली तसेच हिंगणघाट पथकातील समादेशक अधिकारी कैलास रोकडे यांच्या नेतृत्वात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले योग प्रशिक्षक वसंतराव पाल यांनी उत्तम प्रकारे होमगार्ड यांना योग शिकून आरोग्य बाबत मार्गदर्शन केले तसेच बिडकर कॉलेजमध्ये कॉलेज येथे वृक्षारोपण करून पर्यावरण समतोल राखण्याचा व शुद्ध वातावरण ठेवण्या संदर्भात संदेश देऊन स्थानिक लोकांनाही वृक्ष लावणे याबाबत मार्गदर्शन केले यशस्वीतेसाठी सर्वश्री प्रमोद वानखेडे केंद्र नायक , संजय सुरोसे प्रशासकीय अधिकारी , प्रदीप बलवीर पलटण नायक , अनंत गजबे प्रमुख लिपिक , हेमलता कांबळे समादेशक अधिकारी , कैलास रोकडे समादेशक अधिकारी हिंगणघाट , मनोहर ढवळे कंपनी कमांडर , फिरोज खा पठाण वरिष्ठ फलटण नायक पलटण , नायक चंद्रकांत पिंजरकर , वसंत नाईक , गजानन ससाने नितीन शेंडे , चंद्रशेखर शेलकर , सारिका चांबटकर , रंजना करपाते उपस्थित पुरुष व महिला होमगार्डनी सहकार्य करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0