अकोला येथील मलकापूर भागात क्रांतीकन्या मुक्ता साळवे यांची जयंती निमित्य सामाजिक, राजकीय विषयांवर चिंतन बैठक संपन्न झाली.* दि. 5 जानेवारी 2026, रोजी स्थानिक मलकापूर परिसरातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने क्रांतीकन्या मुक्ता साळवे यांची उत्साहात जयंती साजरी करण्यात आली, मुक्ता साळवे यांच्या ऐतिहासिक कार्याची माहिती व महत्त्व यावेळी विशद करण्यात आले, यासोबतच सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीची पण चर्चा झाली, विशेषतः प्रभाग क्रमांक 14 व प्रभाग क्रमांक 13 येथील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, मातंग समाजाला कोणत्याच राजकीय पक्षांनी सन्मानपूर्वक उमेदवारी दिल्या नसल्याची खंत व संताप यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवले आणि लवकरच महापालिका निवडणुकी च्या मतदानाच्या अनुषंगाने व्यापक सामाजिक बैठक घेण्याचा विचार या ठिकाणी चर्चीला गेला, व मातंग समाजाची निवडूनकि संदर्भात लवकरच व्यापक बैठक घ्यावी हा निर्णय झाला,या जयंती उत्सवाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय लहुशक्ती चे अध्यक्ष परिमल मधुकरराव कांबळे होते, तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुभेदार रमेशजी खंडारे, जयदेवजी इंगळे, प्रकाशजी तायडे, रामकृष्ण डोंगरेजी, विष्णूभाऊ शेलारकर, यांची प्रखर भाषणे झाली, सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख रामदासजी तायडे साहेब यांनी विशेष पुढाकार घेऊन केले, या कार्यक्रमाला योगेश भालेराव सागर भालेराव नितीन बांगर गौरव भालेराव प्रल्हाद चव्हाण रोहित खंडारे महेश भालेराव विशाल डोंगरे राजू भालेराव शंकर कलाने करण खंडारे रमेश जाधव रितिक भालेराव सरिता वानखडे कल्पना खंडारे संगीता तायडे रोहित खंडारे गजानन गुरुदेव सुनिता सोनार मेघा तायडे माया टापरे इत्यादी महिला भगिनी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रामचंद्र नावकार
byमीडीया पोलीस टाईम
-
0