पुलगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने केलेल्या कारवाईत ब्राऊन शुगर (हेरॉईन) या अमली पदार्थासह एका आरोपीस अटक करण्यात आली असून ही आतापर्यंतची पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई मानली जात आहे.................................. पुलगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिस्तबद्ध पद्धतीने सापळा रचण्यात आला. या कारवाईत आशिष सुरेश राव लोणकर (वय ३२, रा. तेलघाणी फाईल, वॉर्ड क्रमांक १७, पुलगाव) याला ताब्यात घेण्यात आले.झडतीदरम्यान आरोपीकडून २ ग्रॅम ९ मिली ब्राऊन शुगर (हेरॉईन) अमली पदार्थ तसेच एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ₹३४,५०० इतकी आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक(वर्धा )सौरभ कुमार अग्रवाल,अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.वंदना कारखिले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, डीबी पथक प्रमुख घनश्याम जाधव यांच्यासह विनोद रघाटाटे, गोपाल बावनकर, उमेश बेले, संदीप बोरवण, कुणाल हिवसे व पुलगाव पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे ..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0