*आमदार समीर भाऊ कुणावार यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा* हिंगणघाट :वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांचा वाढदिवस दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार साहेबांना प्रत्यक्ष भेटून तसेच शुभेच्छा देत त्यांच्या दीर्घायुष्य व यशस्वी कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.यावेळी पत्रकार प्रमोद झिबड (वायगाव ह), अनिलराव झाडे सर, देवेश कुबडे, सोनुताई कुबडे,कपिल,कुबडे,स्वप्निल कुबडे, दिनेश बेहरे(हिंगणघाट), शेषराव तुळनकर (बर्फा), पंढरी थुटे (सावरखेडा), प्रभाकर घुमडे, संदीप भोले, माजी सरपंच उत्तम घुमडे, प्रकाश शेंडे, चिंतामण मानकर तसेच भास्कर श्रावणे (वायगाव ह) आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वांनी आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात झालेल्या विकासकामांचे कौतुक करत, भविष्यातही जनतेसाठी असेच भरीव कार्य घडो, अशी अपेक्षा व्यक्त केली. आमदार साहेबांनीही उपस्थित सर्वांचे आभार मानत, जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0