२३ व २६ जानेवारीची नेताजी सुभाष विद्यालया मध्ये विविध कार्यक्रमाची जय्यत तयारी**. (मानवत / अनिल चव्हाण.)*——————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थूच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालय व संभाजी नगर शाखेत २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती व २६ जानेवारी प्रजातंत्र गणराज्य दिना निमित्त विविध कवायती व शैक्षणिक, सामाजी उपक्रम या संबंधी जोरात तयारी सूरू आहे. विद्यालयातील मुख्य ईमारती मध्ये असलेल्या विद्यालयात मा. मुळे सर यांच्या सखोल मार्गदर्शनाखाले विविध कवायती व शारिरिक हालचाली या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे.यावेळी मा. बालाजी गोंन्टे सर, मा. श्रीहरी कच्छवे सर, श्रीमती संगीताताई थोरे यांचे महत्वाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे. तर संभाजी नगर शाखेत मा. बाबासाहेब तेलभरे यांच्या मार्गदर्शनाखाले विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.स्काॅऊट गाईडचे मास्टर ट्रेनर मा. केलासरावजी अबूज सर हे शालेय मूलांना विविध धडे देत आहेत. त्यांना विशेष सहकार्य व मार्गदर्शन मा. सुबान शहा सर हे करीत असून विद्यालयातील शेकडो विद्यार्थी या उपक्रमामध्ये नियमित सहभाग नोंदवित असल्याने विद्यालयातील शैक्षणिक उपक्रमा विषयी जय्यत तयारी सूरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0