*अकोल्यात काँग्रेसचा 'एल्गार'; इम्रान प्रतापगढी यांची विशाल जाहीर सभा संपन्न* * ( अकोला जिला प्रतिनिधि इमरान खान)*अकोला, ९ जानेवारी २०२६:अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आज अखिल भारतीय काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांची विशाल जाहीर सभा पार पडली शहरातील हजरत शाह झुल्फुकार मैदानावर झालेल्या या सभेला जनसमुदायाचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आगामी महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित करण्यासाठी त्यांनी मतदारांना 'पंजा' चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली या सभेचे भव्य नियोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणात इम्रान प्रतापगढी यांनी "द्वेषाच्या विरोधात प्रेमाचा संदेश" (मोहब्बत का पैगाम) देण्याची भूमिका मांडत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांच्या धोरणांवर टीका केली आपल्या खास शैलीतील शायरीतून त्यांनी बेरोजगारी, महागाई आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलेदिनांक: ९ जानेवारी २०२६ हजरत शाह झुल्फुकार मैदान, आर.आर.पी.डी.एस. रोड, अकोलापुढील दौरा: अकोल्यानंतर आज १० जानेवारी २०२६ रोजी त्यांची नांदेड येथे विशाल जाहीर सभा होणार आहे.या सभेमुळे अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0