*स्कॉलर्स प्रि. प्रायमरी स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात... (मानवत / अनिल चव्हाण) मानवत येथील स्कॉलर्स प्रि. प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी (दि. ११) उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एन. एल. पवार, माजी नगरसेविका सौ. सारिकाताई दीपकराव बारहाते,डॉ. राजेश्वर दहे, नगरसेविका डॉ.सौ देवयानी ताई दहे, मुख्याध्यापक माणिक घाटुळ, समाज सेविका सौ.वंदनाताई जोंधळे, भावसार समाज अध्यक्ष संजय लोखंडे, श्री बालासाहेब होगे पाटील, सौ सिंधुताई बालासाहेब होगे, गणेशराव पाटील, सो आरतीताई गणेशराव पाटील यांची उपस्थिती होती.शाळेतील नर्सरी, ज्युनियर आणि सीनियर आणि क्लासच्या चिमुकल्यांनी स्नेहसंमेलनात बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यात या दमलेल्या बाबांची कहाणी या बापलेकीच्या अतूट नाते आणि भावनिक नात्यातील गीत सादर केले. या गीतातील लेकी प्रति असलेल्या बापाच्या हृदयस्पर्शी भावना, भावुक आणि काळजाला भिडणारे गीताचे बोल आणि आजच्या धावपळीच्या आयुष्यात बाप आणि मुलांचा संपत चाललेला संवाद या गीतातून व्यक्त करण्यात आला. अंगावर काटे आणणारे गीताचे बोल आणि नृत्य पाहून प्रेक्षक आणि पालकांच्या डोळ्यात अश्रू आले. स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मिनाक्षीताई कंकाळ, गंगाधर कंकाळ, संध्याताई पांडे, वैष्णवीताई कंकाळ, धनश्रीताई कंकाळ, रेखाताई कदम, राहुल कंकाळ, कुणाल कंकाळ यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनीताई पांडे यांनी केले....
byमीडीया पोलीस टाईम
-
0