मा. मुंबई उच्य न्यायालय, खंडपीठ नागपुर यांनी नायलॉन मांजाच्या वापराबाबत स्वतःहुन एस.एम.पी.एल नंबर ०१/२०२१ अनुसार दाखल करुन दिनांक १२.०१.२०२६ रोजी आदेश पारित केला असुन त्यामध्ये मा. न्यायालयाने नायलॉन मांजाचे विक्री व वापराबाबत अत्यंत कठोर भूमिका घेतली असुन नायलॉन मांजाचा वापर करुन पतंग उडविताना मिळुन आल्यास संबंधीत व्यक्तीकडून २५०००/- रु दंड जागीच वसुल करण्यात यावा, नायलॉन मांजाचा वापर करुन पतंग उडविणारे अल्पवयीन असल्यास त्यांचे पालकांकडून जागीच दंड वसुल करण्यात यावा. व नायलॉन मांजाची विक्री करणारे विक्रेते / दुकानदार हे विक्री करताना मिळुन आल्यास त्यांचे कडुन २,५०,०००/- रु दंड जागीच वसुल करण्यात यावा. जर दोषी व्यक्ती दंड भरण्यास टाळाटाळ करित असेल तर जमिन महसुल प्रक्रियेप्रमाणे दंड वसुल करण्यात यावा व प्रत्येक उल्लंघनासाठी स्वतंत्र दंड आकारावा. याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे, याबाबत सर्वांनी नोंद घ्यावी..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
byमीडीया पोलीस टाईम
-
0