**मतदार दिना निमित्त मानवत शहरात जणजागर रॅली*. (मानवत / प्रतिनिधी. ). ——————————— परभणी येथील *मेरा युवा भारत* व येथील नगर परिषद कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दिनांक २५ जानेवारी मतदार दिवस साजरा करून शहरात जणजागर पदयात्रा काढण्यात आली. हि पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक ते मानवत नगर पालिका कार्यालया पर्यंत काढण्यात आली. यावेळी मतदार जनजागर रॅली मध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विदयार्थीनी पदयात्रेत सामील झाल्या.मानवत तहसिलचे तहसिलदार मा.श्री. पांडुरंग माचेवाड व मानवत नगर परिषदच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे यांनी *हिरवा झेंडा* दाखवला. कार्यक्रमाचा समारोपात मानवत नगर परिषद मध्ये नवीन नोंदणी केलेले मतदारांचे यावेळी स्वागत करण्यात आले तसेच मतदार दिनाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवराचे आभार प्रदर्शन जिल्हा युवा अधिकारी *शशांक रावुला* यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती स्नेहाताई वाघमारे, मैथिलीताई जोशी, सुनिताताई वाकळे, स्वप्ना माथवाले, सुनीताताई नाईक, संगीताताई राऊत, सय्यद वसीम , एस. आय. गवारे यांनी परिश्रम घेऊन प्रयत्न केले..

मतदार दिना निमित्त मानवत शहरात जणजागर रॅली*.        
Previous Post Next Post