राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साही वातावरणात साजरा... (अनिल चव्हाण / मानवत.)———————————आपण आपल्या जिवनामध्ये परिवाराच्या विकासासाठी, आपल्या समाजाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहातो. त्याच प्रमाणे राष्ट्रीय एकता-एकात्मता व मानवता जपण्यासाठी हि सतत प्रयत्नशील राहावे असे आवाहन आझाद एज्युकेशन ॲंड वेलफेयर सोसायटी, परभणी चे संस्थापक सचिव मा श्री अलीशाह खान यांनी केले. राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव ता. मानवत येथील माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष मा श्री इमरान खान, माजी मुख्याध्यापक मा श्री शेख एजाज अहेमद, वर्तमान मुख्याध्यापक मा श्री नवघरे श्रीकृष्ण उपस्थित होते. राजीव गांधी हायस्कूल ताडबोरगाव ता. मानवत या शाळेतील इ. स. २०१० च्या विद्यार्थ्यांनी मनिषा अवचार, अनिल पवार यांच्या पूढाकाराने स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित करुन आपल्या शालेय जिवनातील शिक्षण, शिस्त, संस्कार, आनंद आदि गोष्टींना उजाळा देत अनिल पवार, विलास अवचार, बालाजी जोगदंड, सविता कोसे, कल्पना खरवडे अदि विद्यार्थी-विद्यार्थिंनी आपल्या भावना व्यक्त केले. शिक्षकांच्या वतीने शेख महेमुद, लोखंडे राजू, सय्यद मुनिर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन, स्वागत केले. सुत्रसंचलन कृष्णा पिंपळे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे जेष्ठ लिपिक जोगदंड बाबासाहेब यांनी केले. विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी माजी विद्यार्थीस्नेह मेळाव्यास राणी खरवडे, मीरा अवचार,ज्योती आवचार, कल्पना खरवडे, मिनाक्षी जाधव, ज्योती निर्वळ, ज्योती गोरे, अंबिका हरणे, दयमती मगर, भाग्यश्री अवचार, संगीता हरणे, अंबिका हरणे, सावित्रा बोंबले, अश्विनी चिंचाने रेणुका चिंचाणे, उषा अवचार, रेखा अवचार, माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या, तर विलास अवचार, विशाल पठाडे, विशाल गुंगाणे, गोविंद जोगदंड, बालाजी जोगदंड, राधाकिशन अवचार, अंकुश अवचार, धनंजय खरवडे, अनिल पवार, प्रद्युम्न अवचार, संतोष अवचार, नारायण रासवे, इ. विद्यार्थी उपस्थित राहुल कार्यक्रमाची शोभा वाढवली. आनंददायी कृती कार्यक्रमानंतर राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0