महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या इस्लाम पक्षाची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. माळेगाव शहरात झालेल्या निवडणुकांमध्ये माजी आमदार आसेफ शेख यांच्या नेतृत्वाखालील इस्लाम पक्षाने तब्बल ३५ उमेदवार विजयी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. धार्मिक राजकारण महाराष्ट्रात बळावेल का, अशी शक्यता याआधी वर्तवली जात होती, मात्र आता ती शक्यता प्रत्यक्ष निकालातून समोर येताना दिसत आहे.विशेष बाब म्हणजे, विधानसभेला अवघ्या १६२ मतांनी पराभव स्वीकारलेल्या माजी आमदार आसेफ शेख यांनी स्थापन केलेल्या इस्लाम पक्षाने माळेगाव महापालिका निवडणुकीत दमदार पुनरागमन करत ३५ जागांवर विजय मिळवला आहे.विशेष म्हणजे ही निवडणूक आसेफ शेख यांच्या इस्लाम पक्षाने पहिल्यांदाच लढवली होती. कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना, अल्प कालावधीत संघटनात्मक ताकद उभी करत या नव्या पक्षाने ३५ उमेदवार विजयी केले, ही बाब निश्चितच लक्षवेधी आहे. पहिल्याच निवडणुकीत मिळालेले हे यश अनेक प्रस्थापित पक्षांसाठी धक्कादायक मानले जात आहे. त्यामुळे ‘नविन पक्ष’ ही ओळख आता मागे पडून, आसेफ शेख यांचा इस्लाम पक्ष एक प्रभावी राजकीय ताकद म्हणून पुढे येत असल्याचे चित्र आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या विजयामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.#सकलमुस्लिमयुवकमहाराष्ट्र #मराठीमुस्लिम #इस्लाम_पक्ष #आसेफ_शेख
byमीडीया पोलीस टाईम
-
0