वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी तासगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला ! तर पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांची सातारला बदली, ( सांगली जिल्हा ) संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. सांगली जिल्हा पोलिस दलात नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची तासगांव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सांगलीचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी शनिवारी रात्री उशिरा आदेश काढला आहे. तासगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांचा सांगली जिल्ह्यात कालावधी पूर्णता: झाल्यामुळे त्यांची सातारला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदलीचा आदेश काढला होता. संग्राम शेवाळे हे तासगांव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची तासगांव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या नियुक्तीने तासगांव पोलीस ठाण्याला एक कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी मिळाल्याचे जनतेतून चांगलीच चर्चा होत आहे. त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्र पोलीस खात्यात विविध जिल्ह्यात आणि विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा बजविली आहे. नागपूर,सातारा,पुणे ग्रामीण यासह सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर संजयनगर इस्लामपूर पोलीस ठाण्यात यापूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0