*परभणी जिल्ह्याचा अभिमान साक्षी राठोडचे विभागीय कथाकथन स्पर्धेत घवघवीत यश*. ( ग्रामीण शाळेची लेक ठरली विभागीय स्पर्धेची विजेती )*. (प्रतिनिधी/अनिल चव्हाण.—)——————————अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला व हेलस व मानस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय कथाकथन स्पर्धा आज उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारडी (ता. सेलू) येथील विद्यार्थिनी साक्षी कृष्णा राठोड हिने विभागातून प्रथम क्रमांक पटकावत परभणी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.मानवत रोड येथील जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयात पार पडलेल्या या स्पर्धेत परभणी जिल्ह्याचे नेतृत्व करत साक्षीने अत्यंत प्रभावी, भावपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण कथाकथन सादर केले. तिच्या सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थित रसिकांची मने जिंकली.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. टेकाळे सर (मानवत), सुप्रसिद्ध रंगकर्मी भोसले सर (धाराशिव), जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाचे संस्थापक मा. नितीन लोहट सर, साने गुरुजी कथामालेच्या प्रमुख कल्पनाताई हेलसकर, बाबासाहेब हेलसकर, वायाळ सर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.साक्षीची ठळक वैशिष्ट्ये -साक्षी राठोड ही केवळ कथाकथनापुरती मर्यादित नसून सर्वांगीण गुणवत्ता लाभलेली विद्यार्थिनी आहे.तिला यापूर्वी जिल्हास्तरीय नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे ‘उत्तम कलाकार’ म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट वाचक पुरस्कारानेही तिचा सन्मान झाला आहे. विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक उपक्रमांत साक्षीने प्रावीण्य मिळविले असून ती आपल्या शाळेची ओळख ठरली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पारडीची ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून साक्षी आज ओळखली जाते.साक्षीच्या या यशाबद्दल सेलू तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. उदय जाधव, गटशिक्षणाधिकारी मा. गजानन वाघमारे, मा. नितीन लोहट, शिरीष लोहट, मुख्याध्यापक डी. के. कुलकर्णी आदींनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने विभागीय स्तरावर मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, गुणवत्तेला संधी मिळाल्यास ती कुठेही पोहोचू शकते, हे साक्षीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.**
byमीडीया पोलीस टाईम
-
0