वडगाव प्रभागात क्रमांक ८ मध्ये भाजपकडून महीला सश्रमीकरणाचा संदेश... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती ) चंद्रपूर:-महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या रणधुमाळीत वडगाव प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पार्टीची प्रचार मोहीम जोमात सुरू असून, विकास, विश्वास आणि संघटनशक्तीचे प्रभावी दर्शन घडत आहे. या प्रचाराच्या निमित्ताने वडगाव प्रभागातील भाजप कार्यालयात बचत गटातील महिलांचा भव्य व प्रेरणादायी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला वडगाव परिसरातील विविध बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांना सन्मानित करण्यात आले. महिलांचा सहभाग, उत्साह आणि आत्मविश्वास यामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी माजी खासदार रामदास तडस, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, भाजप नेते प्रकाश देवतळे, भाजप नेते अफजल भाई, वडगाव बचत गट प्रमुख कविता भोयर, गणेश दिवसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याच प्रभागातील गट ‘अ’ मधून सौ. सोनल प्रकाश देवतळे, गट ‘ब’ मधून सत्यम गाणार, गट ‘क’ मधून राखी कंचलावार, तसेच गट ‘ड’ मधून देवानंद वाडई हे उमेदवार प्रचारात सक्रिय असून घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत आहेत. महिलांचा सन्मान, कार्यकर्त्यांचा उत्साह, नेतृत्वाची उपस्थिती आणि उमेदवारांचा प्रभावी संपर्क यामुळे वडगाव प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपचा प्रचार अधिक व्यापक आणि मजबूत होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विकासाभिमुख विचारधारा आणि संघटित शक्तीच्या जोरावर भाजपने या प्रभागात विश्वासाचे नवे पर्व सुरू केले आहे.

वडगाव प्रभागात क्रमांक ८ मध्ये भाजपकडून महीला सश्रमीकरणाचा संदेश...                                                               
Previous Post Next Post