डॉ.आण्णा भाऊ साठे वाचनालयात,सावित्रीबाई फुले जयंती साजरी. (.मारोती एडकेवार जिल्हा: प्रतिनिधी नांदेड )नांदेड : बिलोली तालुक्यातील हिप्पारगा थडी येथे, डॉ. लोकशाहीर आण्णा भाऊ साठे अभ्यासिका व वाचनालयात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची, जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. यावेळी मातंग समाजातील उपस्थित महिला ,जिजाबाई जकोजी एडकेवार, राजाबाई सायबु अंजनीकर,व पारूबाई मारुती एडकेवार,कमळबाई लालू एडकेवार, यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्ड व पॅम्पस संस्थेचे सचिव संदीप एडकेवार, वाचनालयाचे अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार, सचिव राजू अंजनीकर, ग्रंथपाल राजू पिराजी अंजनीकर,सहसचिव दीपक एडकेवार, व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी एडकेवार, गंगाराम एडकेवार, सुरेश एडकेवार, माधव एडकेवार, उमाकांत एडकेवार, व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. वाचनालय विद्यार्थी हे सावित्रीबाई फुले, यांच्या वेशभूषेत मुली, व ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत मुलं, असे विद्यार्थ्यांनी रूप साकार केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, व सावित्रीबाई फुले,यांच्या विषयी माहिती दिली. व संदीप एडकेवार यांनी,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष पत्रकार मारोती एडकेवार यांनी केले, व आभार वाचनालय सचिव राजू अंजनीकर यांनी व्यक्त केले.

डॉ.आण्णा भाऊ साठे वाचनालयात,सावित्रीबाई फुले जयंती साजरी.                                                                         
Previous Post Next Post