आज मांडगाव येथे *संत बऱ्हाणपूरे महाराज प्रकट दिन सोहळा उत्सावा निमित्याने खासदार अमरभाऊ काळे, जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले* यांनी उपस्थित राहून संत बऱ्हाणपूरे महाराज यांचे दर्शन घेतले. प्रकटदिन सोहळा उत्सवा निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनानंतर खासदार अमरभाऊ काळे, जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ वांदिले यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला आणि मांडगाव परिसरातील विकासकामांबाबत चर्चा केली. याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.
byमीडीया पोलीस टाईम
-
0