सब्जी मार्केट मधे दारुचा महापुर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष ..... (हिंगणघाट विशेष तालुका प्रतिनिधी)हिंगणघाट येथील भाजी मार्केट मधे दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. पण याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या दारू विक्रेत्याचे चांगलेच फावले आहे. या अवैध दारू विक्रेत्या मुळे या परिसरात मोठा गोधळ होत असल्याचे दिसून येते. येथे कधी कधी तर भांडणे देखील होताना दिसून येते. या भांडणे व गोंधळा मुळे येथील वातावरण दिवसा गणिक बिघडत चालले असल्याचे दृश्य दिसत आहे. शहरातील हा भाग भाजी विक्रेता साठी मोठा आहे. तसेच इथे सर्व स्थरातील नागरिक येत असतात. तसेच या ठिकाणी सर्व साधारण कुटुंब देखील व्यवसाय करीत असतात. तसेच या ठिकाणी महिला देखील बाजार साठी येतात. याठिकाणी इतर ठिकाणी मिळणाऱ्या भाजी पेक्षा कमी दरात भाजी मिळत असल्याने या ठिकाणी नेहमी ग्राहकाची वर्दळ असते. पण आता याच ठिकाणी दारू विकण्याचे प्रमाण वाढल्याने इथे येणाऱ्या ग्राहकांना आणि विक्रेत्यांना देखिल त्रास होऊ लागला आहे. पण पोलिस प्रशासनाचे याकडे पोलिस प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने दारू विक्रेते निर्ढावलेले दिसून येत आहे. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष घालून यावर कडक कारवाही करण्याची मागणी केली जयजात आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0