*नाॅट रिचेबल, ग्राम सेवकांच्या मनमानीला गोगलगाकर कंटाळले , तात्काळ बदली करण्याची गोगलगावकरांची मागणी. (मानवत / प्रतिनिधी.)————————मानवत तालूक्यातील मौजे गोगलगाव येथील ग्राम पंचायतीचा कारभार पाहणारे ग्राम विकास अधिकारी यांच्या मनमानी कारभार व नाॅट रिचेबल या कारभारामूळे गोगलगावकर त्रस्त झाले असून दिनांक ०७ जानेवारी रोजी मानवत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांच्या कडे एका निवेदनाद्बारे नेहमीच नाॅट रिचेबल राहणार्‍या ग्राम विकास अधिकारी यांची तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आल्याने ग्राम विकास अधिकारी यांच्या कारभाराच्या चर्चेला उधान आले आहे.सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील मौजे गोगलगांव येथील ग्राम पंचायत कार्यालयाचे ग्राम विकास अधिकारी यांच्या नाॅट रिचेबल कारभारामूळे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी नागरीकांनी मानवत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय, मानवत यांच्याकडे एका निवेदना द्बारे केली. मानवततालूक्यातील मौजे गोगलगाव, आंबेगाव (दिगर)चे कामचूकार व भ्रष्ट्र कारभारात माहिर असलेले ग्राम विकास अधिकारी *शिवकुमार भारतराव कानडे* यांच्या मनमानी व नाॅट रिचेबल कारभाराची सखोल चौकशी करून त्यांची बदली करण्या बाबत निवेदनाद्बारे मागणी केली. तालूक्यातील मौजे गोगलगाव /आंबेगाव (दिगर) ग्राम पंचायतीचे चे ग्राम विकास अधिकारी यांची बदली करण्यात यावी अशी मागणी केल्याने चर्चेला उधान आले. गोगलगाव/आंबेगाव (दिगर) ग्रामसेवक यांना गोगलगाव/आंबेगाव (दिगर) येथे पाच वर्षे पूर्ण झाले आहेत ते सामान्य जनतेसह कोणाचे पण काही ऐकत नाहीत ते स्वतःची मनमानी कारभार करत आहेत, कोणाचा ही फोन उचलत नाहीत, गावाला येत नाहीत, कोणालाही कसलीच किंवा कोणतीही माहीती देत नाहीत, भ्रष्टकामे करण्यात ते नेहमी अग्रेसर आहेत.मानवत पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी यांनी नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन बदली करावी अशी मागणी गोगलगाव ग्रामस्थांनी केली आहे.यावेळी दिलेल्या निवेदनावरज्ञानेश्वर केशवराव मगर, रामेश्वर तूकाराम गूरव, संदिप शंकर साखरे, मिलिंद धोंडीराम गोंन्टे राहणार गोगलगाव यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.**

नाॅट रिचेबल, ग्राम सेवकांच्या मनमानीला गोगलगाकर कंटाळले , तात्काळ बदली करण्याची गोगलगावकरांची मागणी.                                                                           
Previous Post Next Post