*पाल येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा*. -रावेर तालुक्यातील पाल येथील वनउद्यानातील अनुपमा विश्रामगृह येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुका यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोविंद वाकडे, संस्थापक अध्यक्ष व राज्य संघटक संजय भोकरे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे कार्याध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश उपाध्यक्ष किशोर रायसाकडा उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद (शिवा भाईG ) कोळी जिल्हा अध्यक्ष सुनिल भोळे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश पवार रावेर तालुका अध्यक्ष विजय शामराव अवसरमल यांच्या अध्यक्षतेखाली पाल येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय अवसरमल यांनी केले. सूत्रसंचालन विनायक जहुरे यांनी तर आभारप्रदर्शन प्रशांत गाढे यांनी केले. यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने राजेंद्र सोनार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा कणा असल्याचे सांगितले. समाजातील प्रश्न, अन्याय, शासकीय योजना आणि जनतेचे आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. असे असताना पत्रकारांना स्वतंत्रपणे ‘पत्रकार दिन’ साजरा करावा लागतो, ही बाब चिंताजनक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.तसेच शासन स्तरावर अधिकृतपणे पत्रकार दिन साजरा करण्यात यावा, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी ठाम मागणी यावेळी उपस्थित वक्त्यांनी आपल्या मनोगतातून केली यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद (शिवा भाई G) कोळी जिल्हा अध्यक्ष ग्रामीण सुरेश पवार, तालुका अध्यक्ष विजय शामराव अवसरमल, जिल्हा उपाध्यक्ष अनिल आसेकर,राजेंद्र सोनार,विनायक जहुरे, सुनिल महाजन, ज्ञानेश्वर महाजन, विनोद कोळी, दिनेश सैमिरे, ज्ञानेश्वर वैदकर, संतोष कोसोदे, विजय अवसरमल, प्रशांत गाढे,व मीडीया पोलीस टाईम चे मुख्य संपादक हमीद तडवी सह परिसरातील पत्रकार उपस्थित होते

पाल येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा*.                                  
Previous Post Next Post