समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे साजरा जि. प. शाळा मोहमांडली येथे आदिवासी विद्यार्थ्यांना कपडे वाटप* (मोहमांडली (ता. रावेर) :समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे निमित्त जि. प. शाळा, मोहमांडली येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले.मोहमांडली हे गाव अतिदुर्गम आदिवासी भागात असून येथील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले कपडे मिळावेत व शिक्षणाबाबत त्यांचा उत्साह वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमास समता फाऊंडेशनच्या पदाधिकारी आशा सुनील तडवी, शिक्षिका रुबिना फिरोज तडवी, खुशाली जंगले, शाळेचे मुख्याध्यापक भूषण पाटील, शिक्षण समिती सदस्य विनोद पाचपोळे तसेच ग्रामपंचायत सदस्य जुम्मा तडवी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी समता फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

समता फाऊंडेशन अंतर्गत टेलरिंग डे साजरा जि. प. शाळा मोहमांडली येथे आदिवासी विद्यार्थ्यांना कपडे वाटप*                                                                                               
Previous Post Next Post