“संघटनेच्या कार्याचा विजय”; शंकर बोरघरे यांना ‘उत्कृष्ट संघटक’ पुरस्कार जाहीर..! महेश निमसटकर विभागीय संपादक भद्रावती )भद्रावती दि.26 :-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखा चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांना राज्यस्तरीय “उत्कृष्ट संघटक” पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २८ फेब्रुवारी रोजी वाशिम येथे होणाऱ्या २७ व्या राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात संघटनात्मक बळकटी, पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा, ग्रामीण पत्रकारांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि डिजिटल माध्यमांमधून संघटनेचा विस्तार या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. अनेक आव्हानांमध्येही संघटनेचा झेंडा उंच ठेवत त्यांनी सातत्यपूर्ण नेतृत्व दिले आहे. या प्रसंगी संघाचे कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “शंकर बोरघरे यांचा सन्मान म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टांचा गौरव आहे.”राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी त्यांच्या संघटनात्मक निष्ठेचे कौतुक करत, “त्यांनी पदाला नव्हे तर जबाबदारीला प्राधान्य दिले,” असे नमूद केले. तसेच राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी सांगितले की, “मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि संघटनात्मक शिस्त यांचा संगम म्हणजे शंकर बोरघरे. हा पुरस्कार त्यांच्या समर्पणाची साक्ष आहे.” आनखी विदर्भ अध्यक्ष अनुपकुमार भार्गव यांनी हा सन्मान विदर्भातील पत्रकार चळवळीचा अभिमान असल्याचे सांगितले. जिल्हा संघटक रूपचंद धारणे यांनीही बोरघरे यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील पत्रकार एकत्रितपणे कार्यरत असल्याचे नमूद केले. तसेच जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, युवा कार्यकर्ते व पत्रकार बांधवांनी शंकर बोरघरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. “हा पुरस्कार केवळ व्यक्तीचा नाही, तर संघटनेच्या कार्याचा विजय आहे,” अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. न या राज्यस्तरीय सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकारितेला नवे बळ मिळाले असून, संघटनात्मक कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0