*नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विज्ञान दिन साजरा** ( मानवत ( प्रतिनिधी. )* *{ }*——————————नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये मा. सुरेखाताई चंदाले यांच्या मार्गदर्शनाखाले "राष्ट्रीय विज्ञान दिन" साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील बालाजी गोन्टे सर , बाबासाहेब तेलभरे सर ,, एकनाथ मुळे सर , एस.एन. कच्छवे सर , सुबान शहा , कैलास अबूज सर , साईप्रसाद मुनलोड सर , वैभव होगे सर , संगीताताई थोरे मॅडम, मिनाक्षीताई कहात मॅडम , सोनालीताई माने मॅडम, आदीसह शालेय विद्यार्थ्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले या वेळी विविध प्रयोगाचे निरिक्षण करून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाचे पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतूक करण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर *सी.व्ही. रमन* यांनी रमन परिणामाचा शोध लावला होता, त्या निमित्त दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी भारतात हा दिवस साजरा केला जातो. मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये विज्ञान दिना निमित्त विविध प्रयोग सादर करून साजरा करण्यात आला.सी. व्ही रमण यांनी मानवतेला दिलेल्या या महान योगदाना बद्दल, सी.व्ही. रमन यांना १९३० मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक सी. व्ही रमण यांना देण्यात आले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0