🚨 घटनेचा जाहीर निषेध करीत पोलिस कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करण्याची शिवभक्तांची मागणी 🚨 {प्रतिनिधी { अनिल चव्हाण }———————————परभणी जिल्ह्यातील बोरी ता. जिंतूर येथे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती राजे संभाजी महाराजयांचे स्मारक उभारण्याच्या प्रकरणी ४६ शिवभक्त तरुणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक व निषेधार्त असल्याने या घटनेचा शिवभक्तांकडून निषेध व्यक्त करून दोषी पोलिस प्रशासनातील कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन शिवभक्तांनी दिले.सविस्तर वृत्त असे की,इतिहासातील राष्ट्रनायक यांचा सन्मान करणे हा गुन्हा ठरू शकत नाही. ही बाब अत्यंत वेदना दायक आहे.मराठा समाज व सर्व शिवप्रेमीं जनतेच्या वतीने बोरी पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध करीत आज परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया येथे निवेदन देण्यात आले.*@) ४६ शिवभक्तांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत.*@) अटक केलेल्या सर्व तरुणांची तात्काळ सुटका करण्यात यावी.*@) छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनासह कठोर प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.जिल्हा प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा परभणी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना सह शिव प्रेमी नागरिकांनी निवेदना द्वारे दिला आहे.***

🚨 घटनेचा जाहीर निषेध करीत पोलिस कर्मचार्‍यावर कठोर कारवाई करण्याची शिवभक्तांची मागणी 🚨     
Previous Post Next Post